
Supriya Sule Hunger Strike in Pune : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.