सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या कामाची सुप्रिया सुळेंकडून पाहणी

सिंहगड रस्त्याला भा. द. खेर (आनंदनगर) चौकात सुप्रिया सुळेंनी सदर पुलाच्या कामाची माहिती घेऊन पाहणी केली.
Supriya Sule
Supriya SuleSakal
Summary

सिंहगड रस्त्याला भा. द. खेर (आनंदनगर) चौकात सुप्रिया सुळेंनी सदर पुलाच्या कामाची माहिती घेऊन पाहणी केली.

सिंहगड रस्ता - जेमतेम दीड किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागतो तब्बल पाऊण तास... दररोज वाहतूक कोंडी अडकतोय जीव... खड्ड्यातून गाडी होते वारंवार पंक्चर... ॲम्बुलन्स ला देखील मिळे ना वाट... वाहतूक कोंडीचा प्रश्न झालाय बिकट... या आणि अशा अनेक मांडलेल्या सिंहगड रस्त्याच्या वाहतूक कोंडीच्या नागरिकांच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंहगड रस्ता येथे भेट दिली.तसेच आयुक्तांसोबत यावर चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले.

सिंहगड रस्त्याला भा. द. खेर (आनंदनगर) चौकात त्यांनी सदर पुलाच्या कामाची माहिती घेऊन पाहणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या जनसंवाद अभियानांतर्गत अनेक नागरिकांनी याबाबत प्रश्न विचारले होते त्या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, अधीक्षक अभियंता सुष्मिता शिर्के, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, कार्याध्यक्ष शरद दबडे पाटील, माजी आमदार कुमार गोसावी, माजी नगरसेवक शैलेश चरवड, बाळासाहेब कापरे, विकास दांगट, सिद्धेश बनकर, साहिल कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

खासदार सुळे यांना त्यांच्या सोशल मीडियावर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर या पाहणी दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. उड्डाणपुलाच्या कामात मेट्रोचा विचार करण्यात आला असल्याचे श्रीनिवास बोनला यांनी सांगितले.

विकास आराखडा तयार करताना दूरदृष्टीने तयार करणे अपेक्षित असते. पाणी, रस्ते, घनकचरा या मूलभूत गरजांवर सातत्याने काम करणे अपेक्षित आहे. त्याबरोबरीने प्रत्येक भागात मुलांसाठी उद्याने, ओपन पार्क सुविधा असणे गरजेचे आहे, त्यातूनच लहान मुलांचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. असे त्यांनी समाविष्ट गावांच्या अनुषंगाने खासदार म्हणून केलेल्या सुचनांची माहिती दिली.

रस्ता आणि खड्डे याबाबत विचारले असता खा. सुळे म्हणाल्या की, ह्या पंचवार्षिकला असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आमच्या विचाराचे नव्हते. आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेले काम देखील त्यांना पुढे नेता आले नाही. परिणामी प्रभागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. काही गोष्टीसाठी आम्ही देखील पाठपुरावा करत आहोत. प्रभागाच्या विकासकामांसाठी महापौर, आयुक्त यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com