Pune Sinhagad : सिंहगड परिसरात गोरगरिबांना वर अन्य होता कामा नये : सुप्रिया सुळे

सिंहगड परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई दुजाभाव न करता करावी. सर्वांना विश्वासात घेऊन काम करावी
Pune
Punesakal

खडकवासला : सिंहगड परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई दुजाभाव न करता करावी. सर्वांना विश्वासात घेऊन काम करावी. स्थानिकांचा रोजगार सुरू राहिला पाहिजे. पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. पर्यटन वाढले पाहिजे. यासाठी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे व आमदार भीमराव तापकीर यांनी सकाळ शि बोलताना या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुप्रिया सुळे, खासदार-

वनविभागाने किल्ले सिंहगड परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान येथील गोरगरीब कष्टकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. अनावधानाने कायदे-नियम यांचे पालन होत नसेल तर, येथील नागरीकांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून यावर मार्ग काढला पाहिजे. येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागा मिळावी. त्यांच्याही उपजिविकेचा प्रश्न सुटावा. यासाठी सरसकट कारवाई करण्याऐवजी विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी, सर्व घटकांनी मिळून प्रयत्न करावेत. येथील स्थानिक लोकांना काम मिळेल व गडाचेही सौंदर्य अबाधित राहील, यासोबतच पर्यटन वाढायला मदत होईल, असा सर्वमान्य तोडगा निघावा, अशी आमची भूमिका आहे. यासाठी मी स्वतः वनविभागाच्या संपर्कात आहे.

भीमराव तापकीर, आमदार

सिंहगडाचे संवर्धन झाले पाहिजे. गडाचे सौन्दर्य टिकविणे. पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच, स्थानिक नागरिकांचा रोजगार हिरावला गेला नाही पाहिजे. कचऱ्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे, प्लास्टिक बंदीची देखील कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. वन विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे असे वन विभागाने सांगितले होते. हॉटेल व्यावसायिकांची अतिक्रमणे काढून त्यांचे एका जागी पुनर्वसन करणार असल्याची माहिती दिली होती. विरोध असणाऱ्या नागरिकांना बरोबर घेऊन दुजाभाव न करता कारवाई व्हावी. असे त्यांना कळविले होते. एकत्रित स्टॉल उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com