Supriya Sule : धमक्या देणारे उद्या घरात घुसतील - सुप्रिया सुळे

जे सत्तेत आहेत ते दम देत आहेत. विधानभवनात मंत्री व आमदार मारामारी करीत आहेत. लोकशाही नसून दडपशाही सुरू आहे.
Supriya Sule
Supriya SuleSakal

दौंड : जे सत्तेत आहेत ते दम देत आहेत. विधानभवनात मंत्री व आमदार मारामारी करीत आहेत. लोकशाही नसून दडपशाही सुरू आहे. आज दमबाजी व धमक्या देणारे उद्या घरात घुसतील ; पण आम्ही गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा इशारा दिला. त्या म्हणाल्या, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यात फिरू न देण्याची धमकी देण्यात आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे स्वतःच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे.

आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यानंतर आम्ही जर गप्प बसलो तर घाबरलो, असा अर्थ निघेल व त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मावळचे आमदार सुनील शेळके यांना जाहीररित्या उत्तर द्यावे लागले. ज्यांना भीती दाखविण्यात आली त्यांचे कैवारी म्हणून शरद पवार दडपशाहीच्या विरूध्द पुढे आले आहेत. आमच्याकडे साम, दाम, दंड व भेद नीती नाही परंतु सत्ताधार्यांकडे सर्व यंत्रणा आहे.

कुरकुंभ (ता. दौंड) येथे सापडलेला मेफेड्रोनचा साठा व राज्यातील ड्रग्जच्या तस्करी संबंधी प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्जच्या विषयावर तोंड उघडले पाहिजे. हे कोणाचे षडयंत्र आहे आणि त्याचा मास्टरमाइंड कोण आहे ?, हे देशाला सांगितले पाहिजे. ड्रग्जवरील कारवाई हा राजकीय विषय नसून तो एक गंभीर सामाजिक विषय असल्याने त्या बाबत कुठलीही तडजोड न करण्याची खंबीर भूमिका घेतली पाहिजे.

दौंडचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची अवघ्या ३४ दिवसांत तडकाफडकी बदली झाल्यासंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या, कुठेतरी एखाद्या कष्ट करणार्या माणसावर जबाबदारी टाकतात. ज्यांना येऊन काही दिवस झाले आहेत त्यांची बदली केली जाते, पण महाराष्ट्र सरकार या प्रकरणाच्या पूर्ण मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com