Supriya Sule Video: आमच्या सिरियलवर तोडगा काढा, पैसे वाया जातात; पुणेरी आजीबाईंचा प्रश्न- सुप्रिया सुळेंना उत्तर सुचेना

Supriya Sule : सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर असताना एका आजीबाईंनी त्यांच्याकडे टीव्ही जाहिरातींची तक्रार केली.सुप्रिया सुळे यांनी आजीबाईंची तक्रार आस्थेने ऐकली, पण त्यांनाही यावर हसू आले.
Supriya Sule

Supriya Sule listens to a Pune grandmother’s humorous complaint about excessive TV advertisements during her visit, sparking laughter and social media buzz.

esakal

Updated on

Summary

  1. आजीबाईंनी १५ मिनिटांच्या कार्यक्रमात जाहिराती जास्त असल्याचे सांगितले.

  2. सुप्रिया सुळे यांनी २२ मिनिटांचा भाग असतो असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला.

  3. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video: सामान्य नागरिक राजकीय नेत्यांकडे आपल्या अनेक तक्रारी घेऊन येत असतात, त्याचं निवारण व्हावे ही त्यांना आशा असते. नेत्यांकडून त्यांना कधीआश्वासन मिळते तर कधी मागण्या अशा असतात की त्यांना काय उत्तर द्यावे याबाबत नेतेही बुचकळ्यात पडतात. असाच एक प्रसंग खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यादरम्यान पुण्यात घडला आहे. एका पुणेरी आजीबाईंच्या अजब मागणीने सुप्रिया सुळेंसह उपस्थित सगळेच चक्रावले, आजीबाईंच्या मागणीवर काय उत्तर द्यावे हे सुप्रिया सुळेंनाही सुचेना. मात्र आजीबाईंची मागणी ऐकून त्यांच्यासह इतरांनीही हसू आवरले नाही. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com