Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

आजपर्यंत तुम्ही माझ्यावर माझ्या वडीलांवर बोलला तो पर्यंत ऐकून घेतल मात्र तुम्ही माझी आई किंवा रोहित पवारांची आई यांच्याबाबत बोलाल तर करारा जबाब देईन
supriya sule
supriya suleSakal

बारामती : आजपर्यंत तुम्ही माझ्यावर माझ्या वडीलांवर बोलला तो पर्यंत ऐकून घेतल मात्र तुम्ही माझी आई किंवा रोहित पवारांची आई यांच्याबाबत बोलाल तर करारा जबाब देईन, हा इशारा समजू नका,

आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही किंवा बोलू शकत नाही असे नाही, नात्यांचे वाभाडे मी तरी निघू देणार नाही....अशा शब्दात महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बारामतीत महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी (ता. 3) आयोजित महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. या मेळाव्यास पवार कुटुंबियांपैकी प्रतिभाताई पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार, शुभांगी पवार, कुंती पवार, सई पवार, रोहित पवार, रेवती सुळे यांच्यासह विद्या चव्हाण, निर्मला सावंत, सक्षणा सलगर, पौर्णिमा तावरे, वनिता बनकर, विकास लवांडे, शिवरत्न शेटे उपस्थित होते.

अजित पवार यांचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, कोणीही कोणाची पात्रता काढू नये, आईच्या बाबतीत मग ती माझी असो किंवा रोहितची असो खपवून घेणार नाही.

आमच्याबाबतीत बोलता तो पर्यंत ठिक आहे पण इतकाही उद्रेक करु नका, की काहीतरी होईल...असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला. नाती तोडायला काही लागत नाही पण नाती जपायला ताकद लागते, मलाही अरेला कारे करता येत पण गप्प बसून सहन करायला अधिक ताकद लागते.

काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या मोठ्या पक्षाला माझ्याविरुध्द उमेदवार मिळत नाही, आमच्याच कुटुंबातील एका माऊलीला माझ्या विरुध्द उभे केले, वार करायचा असेल तर समोरुन करा, कुटुंब फोडून कशाला वार करता, असा सवाल सुळे यांनी केला.

महिलांना आरक्षण दिल्याचे ते सांगतात मग याच लोकसभा निवडणूकीला त्यांनी का आरक्षण दिले नाही, भाजपला महिलांना आरक्षणच द्यायचे नाही, असा आरोप त्यांनी केला. जो पर्यंत या राज्यातील लेकी आहेत तो पर्यंत शरद पवारांना भाजपच काय इतर कोणीही संपवू शकत नाही. आजही शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार हेच समीकरण आहे, कोणी काहीही म्हटले तरी हे समीकरण कधीच बदलू शकणार नाही. प्रास्ताविकात सुनंदा पवार यांनी मेळाव्यामागील पार्श्वभूमी विशद केली. आमदार रोहित पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

आईची भविष्यवाणी खरी ठरते....

2014 मधील निवडणूकीला तुमचे सरकार येणार नाही असे माझी आई म्हणायची कारण महागाई वाढली होती, आताही मोदींचे सरकार परत येणार नाही असे तिला वाटते, आईची भविष्यवाणी खरी ठरते, त्या मुळे यंदा परिवर्तन निश्चित होईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ओरिजिनल डीएनए पवारांचा....

आम्ही सून म्हणून पवार कुटुंबात आलो पण सुप्रिया सुळे जन्माने पवार आहेत, त्यांच रक्ताच नात असून त्यांचा ओरिजिनल डीएनए पवारांचाच आहे, आणि मी कधी नंदेची (नणंद) जागा घेणार नाही, असे शर्मिला पवार यांनी भाषणात नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com