सुप्रियाताईंना करायचाय पुणे जिल्हा टीबीमुक्त

SUpriya_Sule
SUpriya_Sule

इंदापूर (पुणे) : सध्या सर्वत्र कोविड 19 या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग सुरू असला, तरी त्याचा मृत्युदर कमी आहे. त्या तुलनेत टीबीने दरवर्षी साडेचार लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे देशात पुणे जिल्हा टीबीमुक्त करण्याचा पायलट आराखडा आपण खासदार अमोल कोल्हे व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या सहकार्याने तयार केला  असून, जिल्हा टीबी, कोरोना, मलेरिया व डेंगीमुक्त करण्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

इंदापूर शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, वीज मंडळाचे तालुका अभियंता रघुनाथ गोफणे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गोफणे आदींनी आपला आढावा या वेळी सादर केला. जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, प्रतापराव पाटील, रत्नाकर मखरे, महादेव सोमवंशी, अनिल राऊत यांनी सूचना मांडल्या. तसेच, सलून दुकाने व पान पट्टी चालू कराव्या, दुकाने सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू ठेवावीत, अशा सूचना अनेकांनी मांडल्या.

खासदार सुळे म्हणाल्या, संजय गांधी योजनेअंतर्गत जूनपर्यंत 11 हजार 387 लाभधारकांचे 2 कोटी 29 लाख 93 हजार 600 रुपये संबंधितांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मनरेगाची 79 कामे सुरू असून, २ लाख 26 हजार 858 मजुरांसाठी 1531 कामे प्रस्तावित आहेत. 20 हजारांपैकी 15 हजार मुले प्राथमिक शिक्षण प्रवाहात असून, 97 व्हिडीओपट पंचायत समितीने तयार केली आहेत, ही कौतुकाची बाब आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगले काम केले असून, त्यांचा लवकरच सत्कार करणार आहे.

या वेळी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, महारुद्र पाटील, सचिन सपकळ, सचिन बोगवत, पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक अनिकेत वाघ व पोपट शिंदे आदी उपस्थित होते.

दत्तामामांच्या सोलापुरातील कामाचे कौतुक 
सोलापुरात बिडी व यंत्रमाग कामगार जास्त असून, तेथे श्वसन मार्गाचे आजार असलेले जास्त रुग्ण आहेत. मात्र, इंदापूरचे आमदार व राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तेथे कोरोनाच्या साथीत कौतुकास्पद काम केले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगताच उपस्थितांनी त्याचे उस्फुर्त स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com