Election Result : सुप्रिया सुळेंची बारामतीत आघाडी पण, खडकवासल्यात पिछाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर सुमारे दीड लाख मताधिक्याने आघाडी घेतली. बारामतीत मतदारसंघात सुळे यांचा विजय झाला असला तरी खडकवालसल्याने मात्र राष्ट्रवादीला चिंतनच नव्हे चिंताही करायला भाग पाडले आहे.

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर सुमारे दीड लाख मताधिक्याने आघाडी घेतली. बारामतीत मतदारसंघात सुळे यांचा विजय झाला असला तरी खडकवालसल्याने मात्र राष्ट्रवादीला चिंतनच नव्हे चिंताही करायला भाग पाडले आहे.
लोकसभा निवडणुकीत सुळे यांच्यासाठी एकदिलाने काम करण्याची भीष्प्रतिज्ञा करीत खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी झटले. परंतु, भाजपच्या ताकदीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत राजकारणही भाजपच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. त्याचवेळी काही केल्या खडवासल्यात उभारी मिळत नसल्याने येथून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पोटात आताच गोळा आला आहे.

लोकसभेच्या मागील निवडणुकीत सुळे यांच्याविरोधात महायुतीचे महादेव जानकर यांना खडकवासल्याने साथ देत 28 हजारांचे मताधिक्‍य दिले होते. त्यामुळे या भागात पिछाडीवर गेल्याची बाब राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली होती. त्यात गेल्या पाच वर्षात भाजपने आपला विस्तार केला तरीही खडकवासल्यातून मोठे मताधिक्‍य मिळविण्याचा राष्ट्रवादीचा इरादा होता. त्यासाठी पक्षाचे नेते अजित पवारांनीही पक्षार्तंगत कुरघोडी करणाऱ्यांवर डोळे वटारले होते. त्यामुळे अंतर्गत वादाचा फटका बसण्याची चिन्हे नव्हती.

सुळे यांनीही खडकवाल्यावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना येथील मते वाढविता आली नाहीत. मतमोजणीदरम्यान पहिल्या फेरीपासून कुल यांनी किमान दोन-अडीच हजारांची आपली आघाडी कायम ठेवली. ती शेवटच्या 23 व्या फेरीतही सुळे यांनी तोडता आली नाही. त्यात या मतदारसंघातील ग्रामीण भागात सुळे यांनी आघाडी मिळाल्याचे सांगण्यात आले, येथील शहरी भागात राष्ट्रवादीबाबतची नाराजी दिसून आली आहे. दुसरीकडे मात्र, भाजप आमदारांसह या पक्षाच्या नगरसेवकांनी कुल यांना घरोघरी पोचवून मताधिक्‍य वाढविल्याचे स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule's lead in Baramati, but behind the in trail khadakwasala