दीड हजार रुग्णांवर शिबिरात शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

देहू - मावळ तालुक्‍यातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात दीड हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात हृदयरोग, कॅन्सरवरील आजारावर उपचार करण्यात आले. अपंगांना दाखले आणि साहित्य देण्यात आले. भविष्यात ‘मावळ तालुका सशक्त आणि समर्थ मावळ’ करण्याचा संकल्प आहे, असे प्रतिपादन आमदार बाळा भेगडे यांनी देहूरोड येथील वैश्‍य समाज मंदिरात केले.

आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्‍यात २१ जानेवारीला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील रुग्णांना साहित्याचे वाटप, अपंगाचे प्रमाणपत्र दाखले देहूरोड येथील वैश्‍य समाज मंदिरात भेगडे यांच्या हस्ते देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष ॲड. कैलास पानसरे अध्यक्षस्थानी होते. मावळचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, प्रशांत ढोरे, सुमित्रा जाधव, संग्राम काकडे आदी उपस्थित होते. भेगडे म्हणाले, ‘‘मावळ तालुक्‍यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवक कार्यरत आहेत. रुग्णांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.’’

Web Title: surgery on 1500 patient in camp