सुरजितसिंग हे देशातले महत्त्वाचे कवी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे - ""चांगली कविता ही नुसती वाचून संपत नाही, तर ती आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते. आजूबाजूचे जग करुणेच्या बळावर बदलले पाहिजे, अशी भावना सतत मनात निर्माण करत राहते. अशा कविता सुरजितसिंग पातर यांनी शब्दबद्ध केल्या, त्यामुळेच ते केवळ पंजाबचे नव्हे, तर देशातले महत्त्वाचे कवी आहेत,'' असे गौरवोद्‌गार साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी गुरुवारी येथे काढले.

पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला "सरहद'तर्फे आयोजित समारंभात "सुरजित पातर यांची कविता' या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन डहाके यांच्या हस्ते झाले. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष सुरजितसिंग पातर, लेखिका प्रभा गणोरकर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अनुवादक अनुपमा उजगरे, "सरहद'चे संस्थापक संजय नहार उपस्थित होते.

डहाके म्हणाले, ""कवी हा काळाचा साक्षीदार असतो. त्याच्या अवतीभोवती जे घडत असते, त्या घटनांचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. हिंसा, क्रौर्याचा इतिहास आणि अस्वस्थ वर्तमान अनुभवलेल्या पातर यांच्या कवितेतून तडफड व्यक्त होते, त्याचवेळी करुणाही दिसते. त्यांची ही भावना वैयक्तिक नसून समाजाची, बहुसंख्याकांची आहे. त्यांची काल- परवाची कविता आजची वाटते. कवितेतील प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द वाचकांच्या मनावर प्रभाव टाकणारा आहे.''

हा माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण
""आम्ही पंजाबी लोक महाराष्ट्र ही संतांची भूमी, पावनभूमी मानतो. या मराठी भूमीत पंजाबी संमेलनाच्या निमित्ताने पंजाबी भाषेचे गाणे गायले जात आहे, याला नक्कीच वेगळा अर्थ प्राप्त होईल, पुढे एकतेचा अध्याय लिहिला जाईल. त्यामुळे हे संमेलन माझ्यासाठी ऐतिहासिक असा क्षण आहे,'' अशी भावना पातर यांनी व्यक्त केली.

Web Title: Surjit Singh important poet of nations