Sushma Andhare : अजित पवारांनी `भटकती आत्मा ` कसे ऐकून घेतले - सुषमा अंधारे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर ज्येष्ठ नेते शरद पवार हयात असताना त्यांचा ` भटकती आत्मा `असे उल्लेख करीत असतील तर त्या सभेला उपस्थित असणारे उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी ते कसे ऐकून घेतले ?
sushma andhare over ajit pawar statement of pm modi bhatakti atma
sushma andhare over ajit pawar statement of pm modi bhatakti atmaSakal

दौंड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर ज्येष्ठ नेते शरद पवार हयात असताना त्यांचा ` भटकती आत्मा `असे उल्लेख करीत असतील तर त्या सभेला उपस्थित असणारे उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी ते कसे ऐकून घेतले ? रक्त, गोत्र, कुटुंब एक असतानाही शरद पवार यांचा विश्वास राखू न शकणारे अजित पवार हे तर आम्हाला कधी पण बुडवायला तयार आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी ही टीका केली. अप्पासाहेब पवार, रामभाऊ टूले, शरद सूर्यवंशी, अनिल सोनवणे, सचिन खरात, हरेश ओझा, सुरेश वाघमारे, रवींद्र जाधव, मनिषा सोनवणे, नीना जोसेफ, आदी मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुषमा अंधारे म्हणाल्या, राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना हरवायचा विचार अजित पवार यांनी राजकारणाचा भाग म्हणून करावा. पण ज्यांच्यासोबत अनेक वर्षे राहिला, अंगाखांद्यावर खेळले, ज्यांनी बोट धरून शाळेत सोडले असेल त्या शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले जात असताना अजित पवार शांत राहिले.

भटकती आत्मा कोणाची आहे ? व नरेंद्र मोदी कुठे - कुठे भटकून आले आणि त्याची फलश्रूती काय आहे, हे देखील सांगायला हवे. महाराष्ट्रात आमचे आरोप - प्रत्यारोप चालतील आणि निवडणुकीत आमचं जे व्हायचे ते होऊ द्या. पण बाहेरचा कोणी येऊन आमची अस्मिता आणि प्रेरणास्थानाबद्दल अपशब्द काढत असेल तर महाराष्ट्र नरेंद्ग मोदी यांचा नाद पूरा केल्याशिवाय राहणार नाही.

त्या पुढे म्हणाल्या, भाजपने ज्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि ज्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) धाडी पडल्या त्या लोकांचा ते आता प्रचार करीत आहेत. निवडणुकीत मतदारांनी खोके घेणारे, पक्ष फोडणारे आणि कारवाईला घाबरून पक्षांतर करणार्यांचे उमेदवार नाकारावे आणि स्वाभिमानी उमेदवारांना निवडून द्यावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही चाणक्य नाहीत, कारण त्यांनी कोणा नेत्याला घडविले तर नाहीच पण दुसर्यांचे नेते मात्र चोरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com