Sushma Andhare: "शब्द मागे घ्यायला मी चंद्रकांत पाटील नाही"; सुषमा अंधारेंचा टोमणा

पुण्यात बोलताना वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या भाजप नेत्यांवर त्यांनी टीका केली.
Chandrakant Pati_SushmaAndhare
Chandrakant Pati_SushmaAndhare
Updated on

पुणे : बोललेले शब्द मागे घ्यायला मी काही चंद्रकांत पाटील नाही, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. (Sushma Andhare slams on Chandrakant Patil and BJP leaders at Pune)

Chandrakant Pati_SushmaAndhare
RBI : अदानी ग्रुपच्या कथित घोटाळ्यानंतर बँकांची स्थिती कशी? RBIनं पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

अंधारे म्हणाल्या, "मोदींजींच्या कॅम्पनिंगमध्ये 3 टप्पे आहेत डॅमेज, होप आणि ऍक्शन. नेहरुंवर बोलून देखील मोदींना ते डॅमेज करता येत नाहीत. महापुरुषांवर बोलणं म्हणजे जीभ घसरली, चुकून बोललो असं नाही. हे लोक ठरवून डॅमेज करत आहेत. जाणीवपूर्वक हे लोक महापुरुषांना डॅमेज करत आहेत. एकनाथ शिंदेना उभा करण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना डॅमेज केलं. संजय राऊत यांनी डॅमेज केलं की हा माणूस शिवसेना संपवणार आहे, असा प्रचार सुरु होतो. अनिल देशमुखांनाही त्यांनी डॅमेज केलं आहे. हे लोक महापुरुषांना ठरवून डॅमेज करत आहेत, त्यांना हेडगेवार आणि गोळवलकर यांना स्थापित करायचं आहे. मी माझ्या प्रत्येक शब्दावर आणि वाक्यावर ठाम असते बोललेला शब्द मागे घ्यायला मी काही चंद्रकांत पाटील नाही"

Chandrakant Pati_SushmaAndhare
SSC Exam Hall Ticket: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 'या' तारखेपासून उपलब्ध होणार हॉलतिकीट

देशात पैसा खूप आहे पण तो आदनी अंबानीकडे आहे. 'मै भी चौकीदार' म्हणणाऱ्यांनी आपला खिसा कापला जातोय हे पाहिलं पाहिजे. एक बाई तर चंद्रकांत पाटलांची तुलना जोतिबा फुलेंबरोबर करते. खुटानं कुठं उंटाच्या मुका घ्यायचा असतो का? अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

Chandrakant Pati_SushmaAndhare
Saradha Chit Fund: पी. चिदंबरम यांना ईडीचा मोठा झटका! पत्नीची कोट्यवधींची संपत्ती जप्त

माझं १५ वर्ष जुनं प्रकरण बाहेर काढून बोलणारे देवेंद्रजी आणि सगळे आंदोलन करणारे बागेश्वर बाबाच्या विरोधात चकार शब्द काढत नाहीत. हल्ली खूप पोस्टमन झालेत पोस्टमन असणारे लोक राज्यपाल कोश्यारींविरोधात महाशक्तीला त्यांना परत बोलवा म्हणून एक पत्र लिहीत नाही. म्हणजे पत्र लिहिनं देखील स्क्रिप्टेड आहे, अशा शब्दांत अंधारे यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com