Amit Shah : मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असल्याचं सांगून शाहांच्या ताफ्यात घुसला; 'आयबी'नं थेट...

Amit Shah in pune
Amit Shah in puneesakal

पुणेः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या ताफ्यामध्ये एक संशयित इसम घुसला. हे आयबीच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री अमित शहांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताबयात घेतले.

गंभीर म्हणजे या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताबयात घेतले. सोमेश धुमाळ असे या संशयिताचे नाव आहे. वि विध कार्यक्रमानिमित अमित शाह हे आज पुण्यात आहेत.

सोमेश धुमाळ याने आपण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगून ताफ्यात गेला. स्थानिक पोलिसांना चकवा देणारा सोमेश धुमाळ मात्र शाहांसोबत असलेल्या पोलिस यंत्रणेच्या नजरेतून सुटला नाही. त्याचा माग काढत अखेर स्थानिक पोलिसांनी त्याला गाठले. तो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे माहिती असलेल्या पोलिसांनी सोमेशला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले आहे.

ही व्यक्ती कोण आहे ? ती कोणाच्या वाहनांत बसली, याचा शोध पोलिस घेत आहेत. चतुर्श्रुंगी पोलीस सोमेशला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देत आहेत. जेडब्ल्यू मॅरेट हॉटेल मधून घेतलं या संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com