निलंबित शिक्षकाचा २२ वर्षे वनवास; शिक्षकाचे कुटुंबासह उपोषण सुरू

संतोष शाळिग्राम
Monday, 12 October 2020

एका शिक्षकाच्या आयुष्यात अनुचित प्रसंग घडतो, त्याला अकरा दिवस तुरुंगवास घडतो. त्याचे नोकरीतून निलंबन होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सत्तर दिवसांनी निलंबनाचा काळ संपतो... आणि सुरू होतो वनवास. पुन्हा सेवेत घेण्यासाठी तो सरकारी यंत्रणेशी २२ वर्षे झुंजत राहतो. आता त्यांच्या सेवानिवृत्तीला तीन वर्षे राहिली आहेत. तरीही न्याय मिळत नाही. समोर एकच पर्याय राहतो, तो आमरण उपोषणाचा. म्हणून सेंट्रल बिल्डिंगजवळ त्यांनी त्यांच्या कुटुंबासह उपोषण सुरू केले आहे.

पुणे - एका शिक्षकाच्या आयुष्यात अनुचित प्रसंग घडतो, त्याला अकरा दिवस तुरुंगवास घडतो. त्याचे नोकरीतून निलंबन होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सत्तर दिवसांनी निलंबनाचा काळ संपतो... आणि सुरू होतो वनवास. पुन्हा सेवेत घेण्यासाठी तो सरकारी यंत्रणेशी २२ वर्षे झुंजत राहतो. आता त्यांच्या सेवानिवृत्तीला तीन वर्षे राहिली आहेत. तरीही न्याय मिळत नाही. समोर एकच पर्याय राहतो, तो आमरण उपोषणाचा. म्हणून सेंट्रल बिल्डिंगजवळ त्यांनी त्यांच्या कुटुंबासह उपोषण सुरू केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हडपसर येथील दीपक देशमुख या शिक्षकाची ही व्यथा. ते उरुळी देवाची येथील समता विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या पत्नीचा १९९७ मध्ये भाजल्याने मृत्यू झाला. यासंबंधी तक्रार आल्यानंतर शिक्षण खात्याकडून शिक्षण संस्थेला त्यांचे निलंबन करण्याचे आदेश आला. त्यानुसार कार्यवाही झाली. नंतर खासगी शाळा सेवाशर्ती नियमावलीनुसार (एमईपीएस) ७० दिवसांनी निलंबनाचा काळ संपला. पण २२ वर्षे होऊनही त्यांची सेवा पूर्ववत झाली नाही. 

शाळा सुरु झाल्यानंतर 'एसएमएस'चे पालन अधिक गरजेचे

शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात देशमुख यांना शाळेत हजर करून घेण्याचा आदेशही झाला. मग प्रकरण लोकयुक्तांकडे दाखल झाले. तेथेही या शिक्षकाला पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश झाला. शिक्षण विभागाकडून संस्थेला वारंवार स्मरणपत्रे पाठविली जातात. तरीही त्यांना सेवेत घेतले जात नाही. कायद्यानुसार निलंबनाच्या काळातील भत्ताही मिळाला नाही.

‘मृत्यु’मार्गाला थोपविण्यासाठी हवा ‘सेवा’ रस्ता

संस्थाही न्यायालयात 
आता शिक्षण विभागाने समता विद्यालयातील देशमुख यांचे पद रद्द करून त्यांना वेतन अनुदानासह दुसऱ्या शाळेत रुजू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यावरही अद्याप कार्यवाही झालेली नाही. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार संस्थेचे म्हणणे आहे की, माझे निलंबन संस्थेने केले नाही. त्यामुळे माझे वेतन पूर्वलक्ष्यी प्रभावाने कुणी द्यायचे, या मुद्द्यावर संस्था देखील न्यायालयात गेली आहे. शिक्षण खाते आणि शिक्षण संस्था यांच्या वादात मला मात्र ‘वनवास’ भोगावा लागत असल्याची व्यथा देशमुख मांडतात.

पीएमपीच्या 600 बस रस्त्यावर; उत्पन्न पोचले 30 लाखांवर

पत्नीच्या मृत्यूचे प्रकरण न्यायालयात आहे, त्याचा निकाल लागलेला नाही. पण, शिक्षणविषयक कायद्याच्या सर्व कसोट्यांवर मी पुन्हा सेवेत येण्यास पात्र आहे; तरीही मला न्याय मिळत नाही. दोन दशके पगार नाही, आर्थिक उत्पन्नाचा दुसरा मार्ग नाही. वयोवृद्ध आई, सासू, पत्नी आणि मुलगा यांची जबाबदारी माझ्यावर आहे. आता जगायचे कसे? म्हणूनच न्यायासाठी मध्यवर्ती इमारतीजवळ उपोषण सुरू केले आहे.
- दीपक देशमुख, शिक्षक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspended teacher goes on hunger strike with teachers family for 22 years