शाळा सुरु झाल्यानंतर 'एसएमएस'चे पालन अधिक गरजेचे

SMS
SMS

पुणे - 'अनलॉकच्या प्रक्रियेत सुधारित जीवन क्रम स्वीकारताना आपली दमछाक होत आहे. जूनमध्ये सुरु होणाऱ्या शाळा ऑक्टोबर उलटला तरी कधी सुरु होतील, याबाबत स्पष्टता नाही. पण शाळा सुरु झाल्या, तर सॅनिटायझर, मास्कचा वापर, सोशल डिस्टेनसिंग अशा 'एसएमएस' या सुत्राचा आणि शाळा परिसर, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, संबंधित सर्व घटकांची स्वच्छता याचे काटेकोरपणे पालन करणे अधिक गरजेचे असणार आहे," असा सूर 'लॉकआउटनंतरची शाळा व्यवस्थापन प्रणाली'वर आयोजित कार्यशाळेत निघाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने,तसेच पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्रकुमार सराफ, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ सुजाता कोडग, वैद्य प्रशांत सुरु, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मिलिंद नाईक यांनी मार्गदर्शन केले. शाळा उघडल्यानंतर शाळा व्यवस्थापन, पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मनातील दडपण यांसह त्यांच्या आरोग्याचा धोका, कोविड संक्रमणाचे केंद्र शाळा होऊ नये, शाळा ते घर या प्रवासातील सुरक्षितता अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.

डॉ. नाईक म्हणाले, "हळूहळू एकेक गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. मात्र, शाळा सुरु करण्याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. काही देशांनी आधी शाळा सुरु केल्या आणि मग इतर गोष्टी सुरु करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी जागृती केली.

परंतु, आपल्याकडील परिस्थिती वेगळी आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील विद्यार्थी आपल्याकडे शिकतात. तेव्हा त्याला लक्षात घेऊन आपल्याला शाळा सुरु करताना सुविधांची निर्मिती करावी लागेल. व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना चांगले आणि सुरक्षित शिक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यादृष्टीने अनेक शाळा प्रयत्नही करत आहेत."

प्रा. सराफ म्हणाले, "प्रवेशद्वाराजवळ नोंदणी, तपासणी कक्ष उभारावे लागतील. स्पर्शविरहित हातपाय धुण्यासाठी व्यवस्था, दफ्तरविरहित शाळा, विलगीकरणाची सोय उभारावी लागेल. मास्कचा वापर अनिवार्य करावा लागेल. चक्राकार उपस्थिती, मोकळ्या जागेतील वर्ग सुरु करण्यासह सणवार, सामूहिक प्रार्थना, खेळ याविषयी नियोजन करावे लागेल. वर्गात गुंतवून ठेवावे लागेल. पुस्तकविरहित आधुनिक शिक्षण तंत्राचा वापर वाढवावा लागेल." चर्चासत्रात कोडग यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिने काय काळजी घ्यावी, हे सांगितले. प्रशांत सुरु यांनी विचार मांडले. कार्यशाळेत शंभरहुन अधिक शिक्षक सहभागी झाले होते.

तज्ञांनी मांडलेले मुद्दे :-
- शाळांमध्ये स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध कराव्या लागतील. 
- ग्रामीण व छोट्या शाळेचे प्रश्न हे वेगळे असून त्याकरता विशेष विचार करावा लागेल.
-  शिक्षक हे समाजाला आदरणीय असून ते नवीन व्यवस्थापन प्रणाली सर्व भागधारकांच्या सहकार्याने सहज अमलात आणू शकतील.
- शाळा सुरु होण्यापुर्वी आपत्ती व्यवस्थापन योग्यरीत्या करण्याची गरजेचे
- शाळेशी संबंधित सर्व घटकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी 'कोविड समिती'ची स्थापना हवी.
- शाळेचे नियमित निर्जंतुकीकरण करावे
- वर्गातील बसण्याची व्यवस्था बदलावी लागेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com