
नऱ्हे परिसरामध्ये दुकानदारांना धमकावून भर रस्त्यात कोयते, पिस्तुल हातात घेऊन गुंड रोशन लोखंडे व त्याचे साथीदार रस्त्यात नाचल्याचा प्रकार नुकताच घडला होता. या प्रकाराची माहिती असतानाही आरोपींना पकडण्याचा अथवा त्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना न कळविल्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले होते.
पुणे : पोलिस उपनिरीक्षक न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयात पोलिसांची बाजू व्यवस्थित मांडली न गेली नाही. परिणामी आरोपींना पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळाली. या प्रकाराची अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी दखल घेत पोलिस उपनिरीक्षकाच्या निलंबनाचे आदेश दिले. अविनाश शिंदे असे निलंबन झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नऱ्हे परिसरामध्ये दुकानदारांना धमकावून भर रस्त्यात कोयते, पिस्तुल हातात घेऊन गुंड रोशन लोखंडे व त्याचे साथीदार रस्त्यात नाचल्याचा प्रकार नुकताच घडला होता. या प्रकाराची माहिती असतानाही आरोपींना पकडण्याचा अथवा त्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना न कळविल्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले होते. याच गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. यातील आरोपींना 3 मार्चला न्यायालयात घेऊन जाऊन गुन्ह्यातील जप्त रोख रक्कम 2 हजार 200 रुपये न्यायालयात जमा करावयाचे आहे. तसेच या आरोपींच्या मदतीने फैजल काझी याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची आहे, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून आरोपींची पोलिस कोठडी वाढवून घेण्यात यावी, असे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शिंदे यांना दिले होते. त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना आपण न्यायालयात जात असल्याचे व्हॉटसऍपद्वारे कळविले होते. मात्र, शिंदे हे न्यायालयात हजर राहिले नाहीत.
- पुण्यातील धक्कादायक घटना; आईला मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
स्वत:ची जबाबदारी त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षकावर टाकली. परिणामी न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच दिवशी सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांचा मोबाईल त्यांनी बंद करुन ठेवला होता. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने शिंदे यांचे निलंबन करण्यात आले असल्याचा आदेश डॉ.शिंदे यांनी काढला.