सुतळी बॉम्ब घ्या, बिबट्याला पळवा - वनविभागाचा अजब सल्ला

दत्ता म्हसकर
गुरुवार, 14 जून 2018

जुन्नर (पुणे) : बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करणाऱ्यांना फटाक्यातील सुतळी बॉम्ब देऊन हे वाजवा म्हणजे बिबट्या पळुन जाईल असा सल्ला वनविभागाचे कर्मचारी देत आहेत.

जुन्नर (पुणे) : बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करणाऱ्यांना फटाक्यातील सुतळी बॉम्ब देऊन हे वाजवा म्हणजे बिबट्या पळुन जाईल असा सल्ला वनविभागाचे कर्मचारी देत आहेत.

भर दिवसा घराच्या बाहेर पायऱ्यांवर तर कधी घरामागील आंब्याच्या बागेत येणाऱ्या एक बिबट्याची मादी व तिच्या बछड्यांची निरगुडे ता.जुन्नर येथे गेल्या काही महिन्यापासून मोठी दहशत झाली असल्याचे माजी सरपंच उर्मिला बोडके यांनी सांगितले. कधी दिवसा तर कधी सांयकाळी त्यांचा राजरोसपणे वावर वाढला असून परिसरातील ग्रामस्थ जीवितास धोका होण्याच्या भीती बाळगून सावध वावरत आहेत. परिसरातील अनेक पाळीव व भटक्या कुत्र्यांचा त्यांनी फडशा पाडला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने या बिबटयास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली परंतु त्याकडे वनखात्याने लक्ष दिले नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी बोडके यांच्या घराच्या कंपाउंड वरून बिबटया आला यावेळी त्यांनी टॉर्चचा उजेड दाखवून त्यास पळवून लावले ही बाब वनविभागास वळविण्यासाठी जुन्नर गाठले पण साहेबाची भेट झाली नाही. अखेर फोन केला तेव्हा एक कर्मचारी फटाक्यांचे बॉक्स घेऊन आला वाजविण्याचा सल्ला देऊन निघून गेला दुसऱ्या दिवशी बिबटया आवाजाने पळून गेला का याची चौकशी ही केली पण बिबटयास पकडण्याचे नाव घेतले नाही. या बिबटयाचे बछडे आता चांगले मोठे झाले आहेत यामुळे हे कुटुंब येथून हलविण्याचा मागणी बोडके यांनी वनविभागाकडे केली आहे.

Web Title: with sutali crackers leopard ran away suggestion of forest department employees