#Pmclssue सुतारदरा बनलेय डंपिंग ग्राउंड

PMC-Issue
PMC-Issue

पौड रस्ता - कोथरूडमधील सुतारदरा येथे असलेल्या रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असल्याने या भागाला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा राडारोडा नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहालासुद्धा अडथळा ठरू लागला आहे. येथे साचलेल्या घाणीमुळे पेठकर परिसरातील नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. त्यामुळे राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या जागेबद्दल न्यायालयात वाद सुरू असल्याने पोलिसांच्या देखरेखीखाली ही जागा आहे. काही नागरिक वाहनचालकांकडून पैसे घेऊन येथे राडारोडा उतरवून घेतात. अशा गाड्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने, तसेच वाहतूक पोलिसांनी सुद्धा कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मध्यंतरी शिवतीर्थनगरमधील ज्येष्ठ नागरिक संघाने आवाज उठवल्यावर एका ट्रकला अडवून तोंडदेखली कारवाई करण्याचा भास निर्माण करण्यात आला. परंतु राडारोडा टाकण्याचे थांबले नाही, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. खासगी जागेत पडणाऱ्या या राडारोड्याला थांबवणे ही कोणाची जबाबदारी आहे, याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ आहे. तर पोलिस व महापालिकेचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. याबाबत कोथरूडच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले, की पहाटे तीनच्या सुमारास राडारोडा घेऊन आलेल्या एका ट्रकला पोलिस कर्मचाऱ्यांनी राडारोडा टाकण्यापासून परावृत्त केले. सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन येण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे. महापालिकेने याबाबत योग्य कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com