Tar Kay

Tar Kay
Published on

प्रश्न: सुवर्णसिद्ध जल तयार करण्याकरता पाणी आणि सोन्याचे प्रमाण किती असावे? पाण्यामध्ये सोन्याचा दागिना किंवा चांदी घालून ठेवलं तर असं जल तयार करता येऊ शकेल का? सोन्या आणि चांदी मध्ये आरोग्याकरता काय जास्त चांगलं राहील? अनुप निगम, पुणे.
उत्तर: पाणी उकळत असताना पाणी आणि सोनं जेवढं संपर्कात येतं तेवढं जास्त उत्तम असतं. त्यामुळे पाण्यामध्ये सोन्याचा पत्रा करून घातलेला जास्त उत्तम राहतो. सोन्याचं आणि पाणीचं असं निश्चित प्रमाण काही नसतं. त्यांच्या दोघांचा संपर्क होणं महत्त्वाचं असतं. सुवर्णसिद्ध जलाच्या माहितीकरता डॉक्टर मालविका तांबे युट्युब चॅनल वरती दिलेली संपूर्ण विधी बघणं उत्तम ठरेल. हे सोनं चोवीस कॅरेट शुध्दीचं असणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याच्या जागी कुठलाही दागिना वापरून चालत नाही. सोन्याचा पत्रा एकदा बनवून पाणी उकळण्याकरता वापरायला सुरुवात केल्यास तो वर्षानुवर्षे तसाच राहतो. चांदी वापरून अशा प्रकारे पाणी संस्कारित करण्याचा उल्लेख कुठे सापडत नाही. त्यामुळे पाण्यामध्ये चांदी घालून ठेवणं हे सुवर्ण संस्कारित जलाएवढे फायदे देऊ शकणार नाही. सुवर्णसिद्ध जल साठवून ठेवण्याकरता चांदीचे किंवा तांब्याचे स्वच्छ पात्र वापरता येऊ शकते व तसेच पाणी पिण्यासाठी चांदीचा ग्लास वापरलेला जास्त उत्तम राहील.
-------------------------------------------
प्रश्न: माझा मुलगा बारा वर्षाचा आहे. त्याला अभ्यासात मुळीच रुची नाही. सतत खेळण्यातच लक्ष असतं. एकाग्रता कमी आहे त्यामुळे लिहिताना पण खूप चुका करतो आणि शाळेत मस्ती सुद्धा भरपूर करतो. कृपया याच्याकरता काही औषध सुचवावी. वैदेही पिसाळ, कोल्हापूर.
उत्तर: अकरा बारा वर्षाचं वय खरं तर खेळण्याचाच वय आहे. शाळेत जायचं, सतत अभ्यास करायचा हे सध्याच्या काळातली झालेली पद्धत आहे.
पण तरीसुद्धा अभ्यासात लक्ष लागण्याकरता अभ्यासामध्ये रुची निर्माण होणं गरजेचं आहे. त्याकरता घरच्या कुठेतरी व्यक्तीने खेळत खेळत अभ्यास घेणे अत्यंत गरजेचे आहे. फार जबरदस्ती केल्यास मुलांची अभ्यासामधून रुची अजूनच कमी होत जाते. आत्ता त्याच्या दिनचर्येमध्ये रोज सकाळी पाच सात मिनिटं प्राणायाम करणे, सूर्य नमस्कार घालणे सुरू करावे. तसेच तुपाचे निरांजन लावून त्याच्यासमोर बसून पाच दहा मिनिटं त्राटक करणं मदत करू शकेल. घरच्या मोठ्यां नी रोज संध्याकाळी मुलांबरोबर बसून स्तोत्र म्हणणं अत्यंत गरजेचं आहे. या सर्व गोष्टी केल्याने एकाग्रता वाढायला मदत मिळते. रोज सकाळी मुलांना पंचामृत देणे, बदाम भिजवून खायला देणे, आठवड्यातून दोन तीनदा अक्रोड खाणे याचा फायदा होऊ शकेल. तसेच दिवसातून एकदा संतुलन ब्रह्मलीन घृत घेणे व संतुलनचं रिलॅक्स सिरप रात्री झोपताना घेणे सुद्धा मदत करू शकेल. सुट्ट्यांमध्ये नुसता मोबाईलचा वापर करण्यापेक्षा कुठला तरी छंद जोपासण्याकरता त्याला मदत केलेली जास्त उत्तम ठरेल.
-----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com