कृषी राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'स्वाभिमानी'ची घोषणाबाजी

swambhini activist
swambhini activist

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत आयोजित कार्यक्रमात कृषी
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी
संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे
खोत यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात बुधवारी 'वॅम्निकॉम' येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कृषिमंत्री डॉ. अनिलबोंडे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे केंद्रीय सहसचिव डॉ. आशिष भुतानी, कृषि राज्यमंत्री सदाशिव खोत, कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्‍त सुहास दिवसे आदी या वेळी उपस्थित होते.

खोत यांचे भाषण सुरू असताना चार-पाच कार्यकर्त्यांनी उठून अचानक घोषणादेण्यास सुरवात केली. 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो',
 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झालेला आहे. पीक विमा फसवी 
असून, त्याची चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना पीक विमा कधी भेटणार, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. ऐन कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमुळे काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी त्या
कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला.

''माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भ्रष्टाचार
झाल्याचे राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले. तरीही हे सरकार त्याकडे
दुर्लक्ष करीत आहे. पीक विमा योजनेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी
करण्यात यावी. अन्यथा आम्ही शेतकरी पूत्र रस्त्यावर उतरून आंदोलन करू.''
- पूजा जोळे, महिला कार्यकर्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com