आषाढी वारीमध्ये स्वच्छता अभियान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पुणे - आषाढी एकादशीनिमित्त वारीत अन्न सुरक्षा व स्वछता अभियान राबवणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली. देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालविणाऱ्यांना हातमोजे, टोपी, ॲप्रन आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ६ जुलै व संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ५ जुलैपासून पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे होणार आहे. देहू, आळंदी येथून पंढरपूरपर्यंत सलग १९ दिवस चालणाऱ्या आषाढी वारीत महाराष्ट्रासह विविध प्रांतातून सुमारे १० ते१२ लाख भाविक सहभागी होत असतात. या कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल, रेस्टॉरंट, फिरते विक्रेते हे अन्न पदार्थांची विक्री करत असतात. या कालावधीत सेवा भावी संस्था, व्यक्ती भाविकांना अन्न पदार्थ मोफत देत असतात. यंदापासून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्नछत्राच्या तपासण्या करून सुरक्षित व स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच अन्न व्यावसायिकांचे सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षेबाबत तज्ज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत, असे बापट यांनी सांगितले.

Web Title: Swachh Bharat Abhiyan in Ashadhi Vari