घाणीचे फोटो काढत 'पुणे डस्क फोटोग्राफी'चे स्वच्छ भारत अभियान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

'पुणे डस्क'च्या वतीने हे अभियान आज दि. 7 एप्रिल ला पुण्यातील लाकडी पुल ते भिडे पुल दरम्यान राबविण्यात आले. या रस्त्यावरील घाणीचे फोटो काढून ती जागा नंतर साफ करण्यात आली.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियानात पुण्यातील युवकांनी आज विशेष सहभाग नोंदवत एक अनोखा उपक्रम राबविला. 'पुणे डस्क' आणि महाराष्ट्र आयजी (Maharashtra_ig) व एवणं रेचारसिस (Ewan Researchers) च्या माध्यमातून हे काम केले गेले असून यामध्ये 'फोटो वॉक आणि स्वच्छता' असे या अभियानाचे स्वरूप होते.

'पुणे डस्क'च्या वतीने हे अभियान आज दि. 7 एप्रिल ला पुण्यातील लाकडी पुल ते भिडे पुल दरम्यान राबविण्यात आले. या रस्त्यावरील घाणीचे फोटो काढून ती जागा नंतर साफ करण्यात आली. या कार्यक्रमात विश्रामबाग पोलिस वाहतूक शाखेचे पोलिस उप निरीक्षक सुरज पाटील यांनीही स्वच्छचेनंतर संपूर्ण टिमला भेटून त्यांचे कौतुक केले. या स्वच्छता अभियानात जवळ पास 100 सुजाण पुणेकरांनी सहभाग नोंदविला व या परिसराचा कायापालट केला. 'पुणे डस्क' च्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Swachha Bharat Abhiyaan By Pune Dusk Photography