Swanand Bhore : ऑस्ट्रेलियातील जागतिक स्पर्धेत पुण्याच्या स्वानंदचा डंका

मॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये स्वानंद भोरे जगात सर्वप्रथम
Swanand Bhore
Swanand Bhoresakal
Updated on

कोंढवा - वर्ल्ड मॅथ-डेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मॅथेलेटिक्स मेंटल मॅथ वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धेत १४ ते १७ वयोगटात कोंढव्यातील मनसूख कोठारी शाळेच्या स्वानंद राजकुमार भोरे याने जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे.

दरवर्षी जागतिक गणित दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा घेतली जाते. यंदा ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात भरविण्यात आली होती. स्पर्धेसाठी एकूण ८६ देशातील दोन लाख पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत एकूण २० पायऱ्या असतात. प्रत्येक पायरीमध्ये जास्तीत जास्त गणिती क्रिया करायच्या असतात. यात कमीत कमी वेळेत सर्वाधिक गणिते सोडवत अशा २० पायऱ्या पार करत स्वानंदने जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. स्वानंद मनसुख भाई कोठारी नॅशनल स्कूल कोंढवा या शाळेत इयत्ता दहावीत शिकत असून त्याच्या या यशात त्याचे आईवडील आणि शिक्षक वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळाले.

त्याचप्रमाणे यावर्षीच्या एमएसओ लंडन चँम्पियनशिप २०२५ या जगातील सर्वात कठिण आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या चॅम्पिअनशिपमध्ये स्वानंदने जगात तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान कायम करून ब्राँझपदक मिळविले. या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम ७ मानवी कॅल्क्युलेटरची निवड करण्यात आली होती.

या स्पर्धेसाठी स्वानंदने दिवसातील ८ ते १० तास सराव केला होता, अशी माहिती त्याचे पालक राजकुमार भोरे यांनी दिली. या स्पर्धेत दिलेली गणिते कमीत कमी सेकंदात जास्तीत जास्त वेगाने सोडविणे अपेक्षित असते.

या सर्व गणिती क्रिया हातात कोणताही कागद पेन न घेता आपल्या बुद्धीचा कस लावून मानसिक स्तरावर कराव्या लागतात. स्वानंदने हे आव्हान स्वीकारून जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला.

अशी असतात उदाहरणे

या स्पर्धांसाठी गुणाकारात चार अंकी संख्येला सहा अंकी संख्येने गुणणे, भागाकारात दहा अंकी संख्येला पाच अंकी संख्येने भागणे, दशांश चिन्हांचे घनमूळ काढणे, पॉवर मॉड्युलस, वर्गांची बेरीज करणे, कठीण अपूर्णांकांच्या क्रिया जसे की, अपूर्णांकांचा गुणकार आणि भागाकार करणे, तारखांवरून दिवस काढणे अशा प्रकारची कठिण उदाहरणे काही सेकंदातच सोडवायची असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com