esakal | शिवनेरी, लेण्याद्री व ओझरला स्वराज्य ध्वजपूजन
sakal

बोलून बातमी शोधा

ध्वजपूजन

शिवनेरी, लेण्याद्री व ओझरला स्वराज्य ध्वजपूजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वज यात्रेचे ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर तसेच अष्टविनायक लेण्याद्री व ओझर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी ध्वजपूजा केली. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टण अर्थात खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वज उभारला जात आहे.

हेही वाचा: Pune : विसर्जनासाठी १९० फिरते हौद, अडीचशे ठिकाणी मूर्ती संकलन

ही यात्रा कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत ओझर येथून मार्गस्थ झाली. लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध ७४ प्रमुख आध्यात्मिक, धार्मिक ठिकाणे तसेच संतपीठे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले या शक्तीपीठांच्या ठिकाणी तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड) आदी ठिकाणी ध्वज नेण्यासाठी स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘स्वराज्य ध्वज’ उभारणी करून ऐतिहासिक वारसा जपणे, पुढील पिढीला स्वराज्याच्या अकल्पित शौर्याची, मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय जेथे झाला त्या खर्डा किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

हेही वाचा: लेझीमच्या गजरात उत्तर काश्‍मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये गणरायाचे स्वागत

दसऱ्याच्या दिवशी ध्वजाची प्रतिष्ठापना

स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे नवे आयाम स्थापित करून महाराष्ट्राची महती अजरामर करणाऱ्या मावळ्यांच्या कीर्तीची साक्ष असलेल्या खर्डा येथील किल्ल्याच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी (ता. १५ ऑक्टोबर) स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

loading image
go to top