स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार, ठाकरे गटाकडून डेपोची तोडफोड, वसंत मोरेंचा राडा
Swargate Bus Depot : स्वारगेट बसस्थानकात शिवशाहीत तरुणीवर बलात्कार प्रकरणानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाने या घटनेचा निषेध नोंदवत बस डेपोची तोडफोड केली.
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची घटना आज पहाटे घडली. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी डेपोची तोडफोड केली. डेपोच्या खिडकीच्या काचा वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या.