

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना उघडकीस आलीय. सोमवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडलीय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, स्वारगेट बस स्थानकात बंद असलेल्या बसमधील धक्कादायक चित्र समोर आलंय. बसमध्ये कंडोम, साड्या, चादरी आढळून आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर स्वारगेट स्थानकात तोडफोड केली. यावेळी बंद असलेल्या ४ जुन्या बसमध्ये लॉजिंग सुरू असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलाय.