Pune Metro : स्वारगेट-कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार - मंत्री उदय सामंत

पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे.
Pune Metro
Pune Metrosakal

खडकवासला - पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल. असे मंत्री उदय सामंत यांनी नागपूर येथे विधानसभेत सांगितले.

खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये बालाजीनगर तसेच खडकवासला धरण अशा स्थानकाची वाढ करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामंत बोलत होते.

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजूरी घेईल. खडकवासला ते खराडी हा २५.६५ किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन कोल्हेवाडी (सीडब्ल्यूपीआरएस) येथे आहे.

त्याऐवजी ते आणखी पुढे म्हणजे खडकवासला धरणापर्यंत असावे. अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे. त्यांची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com