Pune Mahametro : स्वारगेट ट्रान्सपोर्ट हबची जागा कायमस्वरूपी महामेट्रोला

स्वारगेट येथील तब्बल १३ हजार ९४१ चौरस फुटाचा भूखंड पुणे महापालिकेने महामेट्रोला १० वर्षासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता.
Pune Mahametro
Pune Mahametrosakal

पुणे - स्वारगेट येथील तब्बल १३ हजार ९४१ चौरस फुटाचा भूखंड पुणे महापालिकेने महामेट्रोला १० वर्षासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता हा निर्णय रद्द करण्यात आला असून, ३८ कोटी ५४ लाख ५७ हजार रुपयांच्या बदल्यात ही जागा आता कायम स्वरुपी महामेट्रोला देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत गुपचूप घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न तर बुडाले आहेच, पण मोक्याचा भूखंड देखील महापालिकेच्या हातातून गेला आहे.

पुणे शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. सध्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मार्गासाठी स्वारगेट येथील जेथे चौकात भूमिगत मेट्रोस्टेशन तयार करण्यात आले आहे. पुढील काही महिन्यात हे स्टेशन सुरु होणार आहे.

दरम्यान, महामेट्रोकडून स्वारगेट येथे मेट्रोचे भूमीगत स्थानक उभारले जात असतानाच या ठिकाणी पीएमपी, एसटी स्थानक यांचा समावेश करून ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये व्यावसायिक गाळ्यांचाही समावेश आहे. स्वारगेट चौकातील ही जागा पाणी पुरवठा विभागाची आहे, पण मेट्रोला ही जागा देताना पर्वती टीपी स्कीम ३ मधील फायनल प्लॉट क्रमांक ४९९ व ५०० अ मधील सुमारे १३ हजार ९४१,९४ चौरसमीटर जागा भाडेकराराने देण्याचा निर्णय २०२१ मध्ये घेण्यात आला.

महापालिकेच्या जागा वाटप नियमावलीनुसार, भाडे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. यासाठी स्थापन केलेल्या समितीने १७ जानेवारी २०२३ रोजी रेडीरेकनर दराच्या १२ टक्के वार्षिक भाडे या निश्‍चित केले. ही जागा १० वर्ष भाड्याने दिली जाणार असल्याने रेडिरेकनरचा दर वाढल्यानंतर भाड्यातही वाढ होणार होती. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी ५ कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळणे शक्य होते.

दरम्यान ही महामेट्रोला ही जागा कायम स्वरूपी हवी असल्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे २०२१ च्या रेडिरेकनरच्या दराने ३९ कोटी ५४ लाख रुपयांना ही जागा कायमस्वरूपी महामेट्रोला देण्याचा निर्णय ८ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती व मुख्यसभेमध्ये घेण्यात आला आहे. ही रक्कम महापालिका देय असलेल्या रकमेतून वळती केली जाणार आहे. तसेच राज्य सरकारची मान्यता मिळेल या भरवशावर महापालिका व महामेट्रो यांच्यामध्ये याचा करार केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com