Pune : BRT मार्ग ओलांडण्यासाठी नागरिक जीवावर उदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : BRT मार्ग ओलांडण्यासाठी नागरिक जीवावर उधार

Pune : BRT मार्ग ओलांडण्यासाठी नागरिक जीवावर उदार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी : लॉक डाउन उठल्यावर स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग सुरु करण्यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलन करत मार्ग सुरू केला, त्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने बीआरटी मार्गातील चौकांमध्ये नागरिकांच्या सुरक्षितेकरता वॉर्डन नेमून वाहतूक सुरळीत ठेवली होती, परंतु काही नागरीक जीवावर उधार होऊन धोकादायक पध्दतीने बीआरटी मार्गाच्या कुपनावरून उड्या मारून मार्ग ओलांडतात त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो.

हेही वाचा: Pune : कडबाकुट्टीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

बीआरटी चे बसथांब्यावर जाण्यासाठी चौकातून अथवा थांब्याच्या प्रवासी मार्गीकेतून जावे लागते, चौकातून बस थांब्यावर जाणाऱ्या ठिकाणी काही नागरिक धोकादायक पध्दतीने बीआरटी मार्गाच्या कुपनावरून उड्या मारून रस्ता ओलांडतांत त्यामुळे नागरी मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंदाज चुकून अपघात होतात.

हेही वाचा: परमबीर सिंग फरार घोषित, न्यायालयाचा मोठा निर्णय

कात्रज स्वारगेट बीआरटी मार्ग सुरू होऊन दहा वर्षे झाली आहेत, या मार्गात अनेक अपघात होऊन अनेक नागरीकांचा बळी गेला असून काही कायमचे जायबंदी झाले आहेत, अरणेश्वर बस थांब्याप्रमाणे इतर बस थांब्याशेजारी प्रवासी मार्गिका करण्याची मागणी प्रवासी रोशन शिंदे यांनी केली आहे.

loading image
go to top