‘स्वच्छ शहर’मध्ये लोणावळ्याचा ‘चौकार’ | Clean City | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lonavala
‘स्वच्छ शहर’मध्ये लोणावळ्याचा ‘चौकार’

‘स्वच्छ शहर’मध्ये लोणावळ्याचा ‘चौकार’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - केंद्र सरकारच्यावतीने देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०२०-२१’मध्ये लोणावळा ‘स्वच्छ’ शहर ठरले आहे. सलग चौथ्यांदा लोणावळा शहराने स्वच्छ शहरांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे.

नवी दिल्ली येथे २० नोव्हेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्यासह नगरसेवकांचा गौरव होणार आहे. स्वच्छ भारत मिशनच्या सहसचिव रुपा मिश्रा यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छ शहरांच्या नावांची घोषणा केली आहे.

लोणावळ्याने सन २०१९ मध्ये देशात दुसरे तर २०१८ मध्ये सातवा क्रमांक पटकाविला होता. लोणावळ्याने कचरा मुक्त शहर व सर्वाधिक स्वच्छ व हागणदारी मुक्त शहर असे दोन पुरस्कार पटकाविले आहेत. ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये लोणावळा कचरामुक्त शहर ठरले असून, अभियानात लोणावळ्यास पंचतारांकित मानांकन प्राप्त केले. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सन २०१८ मध्ये १० कोटी, २०१९ मध्ये १५ कोटी व सन २०२० मध्ये १५ कोटी अशी एकूण ४० कोटी रुपयांचा निधी रक्कम लोणावळा शहरास बक्षीस रूपाने मिळाला आहे.

हेही वाचा: पुणेकरांना भरली हुडहुडी; राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद!

सर्व नगरसेवक, नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता प्रेमी व्यक्ती, संस्था, औद्योगिक कंपन्या, शासकीय यंत्रणा, शालेय विद्यार्थी, महिला यांनी केलेले सहकार्य यामुळेच हे शक्य झाले आहे. हा लौकिक कायम ठेवण्याबरोबर शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील.

- सुरेखा जाधव, नगराध्यक्षा, लोणावळा

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत सहभाग

  • कचऱ्यातून कलाकृती तयार करत चौकांचे सुशोभीकरण

  • वरसोली कचरा डेपोचा कायापालट

  • व्यावसायिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून, शहर प्लास्टिकमुक्त

  • बचतगटांच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचे वाटप

  • घरोघरी खत निर्मितीसाठी मॅजिक बास्केटचे वाटप

  • १६ शाळांमध्ये सुका कचरा पासबुक योजना सुरू

loading image
go to top