‘स्वच्छता दूत’ व्याधींनी ग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे - ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या शहरातील तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांच्या आरोग्यावर धोक्‍याची घंटा वाजत आहे. ७० टक्के महिलांना सांधेदुखी आणि अंगदुखीच्या त्रासाने हैराण केले आहे, तर ५१ टक्के महिलांची दृष्टी कमकुवत झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातर्फे कचरावेचक महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला. कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्था यांच्या सहकार्याने ही पाहणी करण्यात आली. यात सहा वॉर्डमधील १०० कचरावेचकांच्या समस्या (आरोग्यविषयक समस्या व आव्हाने) अभ्यासण्यात आल्या. 

‘‘कचरावेचक महिलांसाठी कामाच्या वेळेत कोठेही स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. दिवसभर त्या धूळ- कचऱ्याशी सामना करतात. पिण्याच्या पाण्याचीही सोय उपलब्ध नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करताना ५५ टक्के महिलांना दुखापत होते. कामाच्या ठिकाणी छळ होत असल्याचे नऊ टक्के महिलांनी सांगितले. आरोग्य विमा किंवा कामगार हा दर्जा दिला जात नाही,’’ असे निरीक्षण प्रकल्पातील सहयोगी संशोधक स्नेहा झुंजरुटे यांनी नोंदविले.

सर्वेक्षणातील निरीक्षणे
53% - चाळिशीच्या आतील वेचक
66% - स्वाक्षरी येते; पण वाचता येत नाही
19% - प्राथमिक शिक्षण झालेल्या
14% - माध्यमिक शिक्षण झालेल्या
15% - चांगले आरोग्य
27% - मासिक पाळीत आरोग्यविषयक समस्या 
58% - जनआरोग्य विमा योजनेपासून वंचित

कचरा गोळा करायला गेल्यावर अपमानास्पद वागणूक मिळते, असे अनेक जणींनी सांगितले. स्वच्छतागृह नसल्याने आरोग्यविषयक समस्या उद्‌भवत आहेत.  अभ्यासाचा अहवाल पालिकेला दिला जाणार आहे.
- प्रा. श्रुती तांबे, समाजशास्त्र विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: swatchata doot women sickness health