Video: सलाम! पुण्यातील सफाई कामगार महिलेचा कौतुकास्पद प्रामाणिकपणा

Sweeper_Woman
Sweeper_Woman

औंध (पुणे) : आपल्या खात्यात जमा झालेली अतिरिक्त रक्कम संबंधितांना परत करून प्रामाणिकणा जपत सफाई कामगार महिलेने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आशा प्रणय कांबळे (३२ वर्षे) असं या महिलेचे नाव असून औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या चिखलवाडी आरोग्य विभागात त्या कार्यरत आहेत.

दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर दोन मुलांसह कुटुंबाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. तुटपुंज्या पगारात घर चालवण्याची कसरत करत असताना अशा परिस्थितीत त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे त्यांचा पाच महिने पगार झालेला नाही. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून चुकून त्यांच्या खात्यात तेरा हजार पाचशे रुपये पगारापेक्षा एक लाख एकवीस हजार ही अतिरिक्त रक्कम जमा झाली होती. मागील पाच महिन्यांत पगार न झाल्याने कदाचित सर्व पगार जमा झाला असेल असे त्यांना वाटले, पण इतर सहकारी कामगार महिलांना केवळ एकच महिन्याचा पगार जमा झाल्याचे कळल्यावर कांबळे यांनी मुकादम गौतम वाघमारे आणि अनिता बाराथे यांच्याशी संपर्क साधला आणि अतिरिक्त रक्कम जमा झाल्याचे सांगितले.

यानंतर औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक विजय भोईर यांना याबाबत कल्पना दिली. मोरया एंटरप्रयजेस या सफाई कंत्राटदार कंपनीचे प्रदीप पवार यांनाही माहिती दिली. नंतर धनादेशाद्वारे या महिलेने एक लाख एकवीस हजार रूपये परत करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. बॅंकेकडून चुकून ही रक्कम संबंधित महिलेच्या खात्यात जमा झाल्यानंतर या महिलेने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे कमी असून त्या महिलेला माझा सलाम असल्याची प्रतिक्रिया प्रदीप पवार यांनी दिली.

माझ्या खात्यात एवढी मोठी अतिरिक्त रक्कम जमा झाल्याचे कळताच  मी घाबरले व मुकादमांना कळवले. जमा झालेली रक्कम मी धनादेशाद्वारे परत केली असून या पैशातून अजून नऊ सहकारी कामगारांचा पगार करता आल्याने  मी  समाधानी आहे.
- आशा कांबळे, सफाई कामगार

पगार येणे बाकी असतानाही आशा कांबळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक  आहेच. परंतु या घटनेतून सर्वांनी  आदर्श घ्यावा असाच निर्णय या महिलेने घेतल्याने  प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे हे एक उदाहरण आहे.
- जयदीप पवार, सहाय्यक आयुक्त औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय

संबंधित महिलेने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.अशा या प्रामाणिकपणाबद्दल आशा कांबळे यांचा आमच्या वतीने यथोचित सन्मान करणार आहोत.
- प्रदीप पवार,मोरया एंटरप्रयजेस

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com