उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूचे रुग्ण

Swine-Flu
Swine-Flu

पुणे - कमाल तापमानाचा पारा चाळिशीवर पोचला असतानाही स्वाइन फ्लूच्या नवीन रुग्णांचे निदान होत आहे. तसेच स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना स्वाइन फ्लूच्या निदानाचे प्रशिक्षण देण्याची गरजही या तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

पुण्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर कमाल तापमानाचा चाळिशीपर्यंत गेलेला पारा कमी होतो. हवेतील आर्द्रता वाढते. ढगाळ वातावरण असते. असे वातावरण स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच१-एन१’ विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यामुळे जून ते डिसेंबर-जानेवारीपर्यंत स्वाइन फ्ल्यूच्या उद्रेकाचा धोका पुणे शहर आणि परिसरात असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सांगितले जात होते. यंदा मात्र उन्हाळ्यात पुण्यासह राज्याच्या इतर भागांतही स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हे निरीक्षण नोंदविले. 

डॉ. दिलीप गुप्ते म्हणाले, ‘‘स्वाइन फ्ल्यूची लक्षणे दिसताच त्यावर गुणकारी उपचार करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी वेळेत योग्य निदान आणि प्रभावी उपचार आवश्‍यक आहेत.’’

स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच१-एन१’ या विषाणूंमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांमुळे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होत आहे. पण वेळीच निदान न झाल्याने काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढते. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेतील शास्त्रज्ञांनी दिली.

यंदा मे मध्येही सर्दी, खोकल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. स्वाइन फ्लूशी साधर्म्य असलेल्या या रुग्णांना तातडीने प्रभावी उपचार करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यासाठी महापालिकेतर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- डॉ. सचिन गांधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com