तडीपार आरोपींचा वालचंदनगरमध्ये राजरोस वावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

वालचंदनगर - वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील राजदत्त (आबा) उबाळे खून प्रकरणातील आरोपी तडीपार असतानादेखील वालचंदनगरमध्ये राजरोसपणे फिरत आहेत. पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून दलित पॅंथरचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धनंजय उबाळे यांनी बुधवारी (ता. २३) वालचंदनगर बंदचे आवाहन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. 

पंचायत समिती सदस्य राजदत्त उबाळे यांचा सन २००१ मध्ये खून झाला होता. यातील आरोपींना उच्च न्यायालयाने सन २००६ मध्ये इंदापूर तालुक्‍यामध्ये न राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र, उबाळे यांच्या तक्रारीनुसार तीनही आरोपी पोलिसांच्या आशीर्वादाने वालचंदनगरमध्ये राजरोसपणे फिरत आहेत. या निषेधार्थ त्यांनी वालचंदनगर बंदचे आवाहन केले होते. 

आरोपींचा जामीन रद्द करावा व वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी उद्या (ता. २४) पासून उबाळे हे वालचंदनगर बस स्थानकाजवळ उपोषण करणार आहेत.

एसटीवर दगडफेक
बंदच्या काळात तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन ते चार जणांनी बारामती-वालचंदनगर एस. टी. बसवर दगडफेक केली. चालक नितीन ढेरे हा किरकोळ जखमी झाला असून त्यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: tadipar accused in walchandnagar crime