'संभाजी भिडे, एकबोटेंना तडीपार करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे : कोरेगाव भीमा विजय दिनानिमित्त संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्ह्यासह  पाच जिल्ह्यांतून तडीपार करावे, अशी मागणी भीम आर्मी शहर शाखेचे जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांनी आज (गुरुवार) केली.

कोरेगाव भीमा विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारीलाही लाखो नागरिक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. गेल्या वर्षीच्या घटना पाहता भिडे आणि एकबोटे यांना पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या पाच जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. 

अॅड. चंद्रशेखर आझाद 30 डिसेंबरला पुण्यात येणार असल्याने पुन्हा कोणताही हिंसाचार घडू नये, यासाठी 25 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत भिडे आणि एकबोटे यांना तडीपार करण्यात यावे, या मागणीचे निवेदन पुणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले असल्याचे पोळ पत्रकार परिषदेत सांगितले. 

Web Title: Tadipar to Sambhaji Bhide and Ekbote in Pune District Demand Bhim Army