ब्रिटीशकालीन धरणातील पाण्याची केली तहसीलदार काकडे यांनी पाहणी

पराग जगताप
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीलाच कोरडे ठणठणीत पडणाऱ्या या धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी असुन त्यामुळे भटक्या जनावराचा तसेच वन्यप्रण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्ग लागला असुन जमिनीतील पाणी पातळीही सुधारली आहे.

ओतूर (ता. जुन्नर) - मागील वर्षी गाळ उपसा केलेल्या ब्रिटीशकालीन धरणातील पाण्याची तहसीलदार किरण काकडे यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले. उदापूर ता. जुन्नर येथील ब्रिटीशकालीन छोट्या धरणाला तहसिलदार किरण काकडे यांनी भेट देवुन पाहणी केली. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घेवुन आपल्या परिसरातील पाण्याची भुजल पातळी वाढवण्यास मदत करण्याचे आवाहन यावेळी केले.

मागील वर्षी प्रशासकिय परवानगी घेवुन शेतकऱ्यांनी उदापूर येथील ब्रिटीशकाली छोट्या धरणाचा गाळ उपसला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीलाच कोरडे ठणठणीत पडणाऱ्या या धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी असुन त्यामुळे भटक्या जनावराचा तसेच वन्यप्रण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्ग लागला असुन जमिनीतील पाणी पातळीही सुधारली आहे. यावेळी तहसीलदारांबरोबर लघु पाटबंधारेचे राजकुमार मुके, अनुलोमचे शिरुर उपविभाग जनसेवक संतोष पाटील, अनुलेमचे जुन्नर विभागाचे राहुल दातखिळे, उदापुरचे माजी सरपंच बबन कुलवडे, धनंजय बुगदे, संकेत शिंदे, मोहन वल्हवणकर, विनोद भोर, रमेश कठाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी उदापूर मांदारणे मार्गावर पावसाळ्यात जे ओढ्याचे पाणी रस्त्यावर येते व त्यामुळे शालेय विद्यार्थी व प्रवाशांना धोका निर्माण होतो. यावर उपायाची मागणी सर्वानी केली. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येते. त्याता बंदोबस्त करण्यासाठी या ब्रिटीशकालीन धरणाच्या गाळाचा उपसा रस्त्याच्या मोर्याच्या पुढपर्यंत करण्यासाठी प्रशासकिय स्तरावर परवाणगी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असुन येथे निघनारे गौणखनिज (वाळु) बाबत प्रशासकिय स्तरावर योग्य तो निर्णय घेवुन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे तहसिलदार किरण काकडे यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Tahsildar Kakade inspected the waters of British Dam