नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार लांडगे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

भोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करा. डिसेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून, संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. जे अधिकारी कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

लांडगे यांनी भोसरी मतदारसंघातील आणि शहरातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठक घेतली. विविध प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘इ’ प्रभागाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, दिलीप गावडे, अंबादास चव्हाण, मंगेश चितळे, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

लांडगे म्हणाले, ‘नदी प्रदूषण रोखण्यासाठी आराखडा तयार करा. चाकण हद्दीतील रसायनमिश्रित पाण्याबाबतही बैठक घ्यावी. नदीपात्रातील गाळ काढावा.’’

Web Title: Take action against the dranage water in the river Mahesh Landage