साडेनऊ हजार जणांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

पुणे - शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गुरुवारी (ता. ३) साडेनऊ हजार दुचाकीस्वारांवर हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच विना हेल्मेटप्रकरणी  दुचाकीस्वारांवर इतक्‍या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आहे. 

वाहतूक पोलिसांकडून विना हेल्मेट आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातत्याने कारवाई करण्यात येते. परंतु १ जानेवारीपासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवरील कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. 

मंगळवारी साडेसात हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी तेवढ्याच दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर गुरुवारीदेखील पोलिसांच्या कारवाईचा धडाका वेगाने सुरू असल्याचे दिसून आले. या एकाच दिवशी ९ हजार ५१९ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यात शहरातील विविध वाहतूक विभागांकडून ६ हजार १०५ जणांवर आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून ३ हजार ४१४ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. विनाहेल्मेट दुचाकीस्वाराकडून प्रत्येकी पाचशे रुपये तडजोड शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त तेजस्वी सातपुते यांनी दिली.

Web Title: Take action against more than nine thousand people