esakal | शाळेत कोरोनाबाधित सापडल्यास अशी घ्या काळजी...!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

शाळेत कोरोनाबाधित सापडल्यास अशी घ्या काळजी...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आता सुरू झाले आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेतील फळे, बाक आणि भिंतींनाही विद्यार्थ्यांच्या सहवासाने पुन्हा एकदा जाणिवांचा जिवंतपणा लाभला आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला, परंतु अजूनही कोरोनाचे सावट पूर्णतः दूर झालेले नाही. आपल्या शाळेत कोरोनाबाधित आढळल्यास नक्की काय करावे, याबाबत सरकारचे निर्देश नक्की काय आहे, याचाच घेतलेला हा आढावा.

प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असून, सौम्य लक्षणे आढळली तरी पालकांशी बोलून विद्यार्थ्याची काळजी घेण्याचे आव्हान शिक्षकांवर आहे. आम्ही प्रात्यक्षिकांनी शाळेची सुरुवात केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना कमी गटांच्या संख्येने शाळेत बोलविणे शक्य होईल.

- डॉ. राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

हेही वाचा: बदलत्या आव्हानांसाठी लोहगाव एअर फोर्स स्टेशन मोलाचे ठरत आहे; भूषण गोखले

उपाययोजनांबाबत तज्ज्ञांचा सल्ला

  • सर्दी, ताप, खोकला आणि घसा खवखवणे आदी लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्याने घरी अलगीकरणात थांबावे

  • कोरोना चाचणी सकारात्मक आल्यास विद्यार्थ्याला घरी किंवा रुग्णालयात विलगीकरणात ठेवावे

  • बाधिताच्या संपर्कातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करावी

  • संबंधितांनी शाळेत जाऊ नये

शिक्षकांनी काय करावे..

  • घरात कोणी आजारी असल्यास शाळेत जाऊ नये

  • मास्क आणि शारीरिक अंतराचे कडक पालन करावे

  • स्टाफ रूम आणि जेवणाच्या वेळी अंतर ठेवून बसावे

...तर शाळा बंद होणार

१४ दिवसांच्या कालावधीत शाळेतील बाधितांची संख्या पाच टक्क्यांच्या वर किंवा १० च्या वर गेल्यास शाळा बंद कराव्यात. यामध्ये विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकांची संख्याही सामाविष्ट आहे.

पालकांनीही पाल्य आजारी असल्यास शाळेत पाठवू नये. वर्गात आजारी विद्यार्थी आढळल्यास घाबरून न जाता, त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. तसेच, शिक्षकांनीही या काळात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

- डॉ. प्रमोद जोग, सदस्य, बालरोगतज्ज्ञांचा विशेष कार्यगट

loading image
go to top