बारामतीकरांनो, खरेदीसाठी बाहेर पडताय..पिशवी सोबत ठेवा..

मिलिंद संगई
शुक्रवार, 4 मे 2018

बारामती (पुणे) : घरातून बाहेर पडताना बारामतीकरांनी आता कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत ठेवण्याची सवय लावून घ्यावी, कारण या पुढील काळात कोणताही दुकानदार तुम्हाला पिशव्या देणार नाही, वस्तू नेण्यासाठी स्वतःची कागदी किंवा कापडी पिशवी आता अनिवार्य होणार आहे. 

प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बारामती नगरपालिकेने पावले उचलली असून गुरुवारपर्यंत (ता. 5) नागरिकांसह सर्वच संस्था व व्यावसायिकांनी आपल्या कडे असलेले सर्व स्वरुपातील प्रतिबंधीत प्लॅस्टिक व प्लॅस्टिक वस्तू नगरपालिकेकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपालिकेने या साठी पाच ठिकाणी संकलन केंद्र सुरु केली आहेत.

बारामती नगरपालिका आरोग्य विभाग, रुई क्षेत्रीय कार्यालय, जळोची क्षेत्रीय कार्यालय, खंडोबानगर येथील बारामती ग्रामीण क्षेत्रीय कार्यालय व  तांदुळवाडी येथील कार्यालयात असे प्लॅस्टिक व बंदी असलेल्या थर्माकोलच्या वस्तू कार्यालयीन वेळेत स्विकारल्या जाणार आहेत. 
थर्माकोल किंवा प्लॅस्टिकपासून तयार होणारे ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, काटे, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टिक व वेष्टन, अन्नपदार्थ व धान्य साठवणूकीसाठीचे प्लॅस्टिक यांचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. 

शासकीय संस्था, दुकानदार, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, ढाबेधारक, मॉल्स, केटरर्स, विक्रेते, व्यापारी, फेरीवाले, वाहतूकदार, भाजीपाला फळेविक्रेते या सर्वांनी प्लॅस्टिकबंदीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले  आहे. 

Web Title: take cloth bags dont use plastic bag