महिला सुरक्षेबाबत पोलिस म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

महिलांवरील बलात्कार व अत्याचाराच्या घटना केवळ मेणबत्त्या लावून थांबणार नाहीत, तर त्या साठी प्रत्येक महीलेने स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत.

हडपसर : स्त्रियांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाच्या कल्याणाची शक्यता नाही. महिलांना सक्षम करुनच आपण समाज आणि राष्ट्राला बलवान करु शकतो. त्यासाठी महिलांचा सहभाग, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, त्यांच्या क्षमतांचे संवर्धन आणि या सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे, असे मत हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रघूनाथ जाधव यांनी व्यक्त केले.

चित्रडोसा : रजनीकांत यांच्या सुपर रहस्याचा शोध… 

श्री शिवशंभू महादेव प्रतिष्ठान संचलीत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजीत महिला सुरक्षा कार्यक्रमात जाधव बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी कामठे, मुख्याध्यापक बी. एच. देशमुख, तानाजी देशमुख उपस्थित होते.  

जाधव पुढे म्हणाले, ``संकटाला धैर्याने सामेरे जाण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. महिलांवरील बलात्कार व अत्याचाराच्या घटना केवळ मेणबत्त्या लावून थांबणार नाहीत, तर त्या साठी प्रत्येक महीलेने स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत. पुढयात येणा-या संकटावर मात करण्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःची सुरक्षा स्वतः करावी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच संभाव्य अपघात समस्या दूर करण्यासाठी मनाची एकाग्रता साधून स्वतःची निर्णयक्षमता विकसीत करावी. महाविद्यालय व शाळा परिसरात मुलींना छेडण्याचे प्रमाण अलीकडे वाढत चालले आहे. टवाळखोर युवक शाळा, महाविद्यालय भरताना व सुटण्याच्या दरम्यान परिसरात उभे राहून मुलींची छेड काढत असतात. त्यामुळे अशा घटना तातडीने पोलिसांना कळवाव्यात.''
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take self defense training says raghunath jadhav