'कोरोना प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करा आणि कोरोना पॉझिटिव्ह आलेला एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी आज (ता. ७) आरोग्य विभागाला दिला‌.

पुणे - जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करा आणि कोरोना पॉझिटिव्ह आलेला एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी आज (ता. ७) आरोग्य विभागाला दिला‌.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना आपले पाय रोवू लागला आहे. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी  प्रयत्न करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्यामुळे संशयित रुग्णांच्या तत्काळ टेस्ट घेणे, पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करणे, गरज भासल्यास चाचणी घेणे, क्वरंटाइन करणे, उपचारासाठी तत्काळ दाखल करणे आदी बाबींकडे गांभिर्याने लक्ष दर्या, असेही अध्यक्षा पानसरे यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन त्यावर संभाव्य उपाययोजना करण्यासाठी अध्यक्षा पानसरे यांनी आज जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हा आदेश दिला. यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, भारत शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, संदीप कोहीनकर आदींसह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. 

अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी संतप्त; विद्यापीठाची मात्र सावध भूमिका

जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, उपचारासाठी रुग्णालय आणि अॅंब्युलन्सची संख्या वाढवा. घशातील द्रवाचे नमुने घेण्याचे नियोजन करण्यासाठी, रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नियुक्त करण्याचा आदेश आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी यावेळी दिला.

अशा करा उपाययोजना - बुट्टे  पाटील 
दरम्यान, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि सिईओ आयुष प्रसाद यांना पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे -
- जिल्हा परिषद मुख्यालयात  शिस्त लावावी.
-  आरोग्य विभागातील रिक्त जागा  किमान कंत्राटी पद्धतीने त्वरीत भराव्यात.
-  ग्रामीण भागातील लग्न ,पूजा अंत्यविधी, दशक्रिया याठिकाणी होणाऱ्या गर्दीला प्रतिबंथ घालावा.
- प्रसंगी पोलिस व महसूल विभागाची मदत घ्यावी.
- भाजीपाला बाजार, किरकोळ विक्रेते, दुकाने, दवाखाने यासाठी कडक नियमावली तयार करायला हवी.
- आरोग्य विभागावरील ताण प्रचंड वाढल्याने अन्य विभागाची कामे थांबवून तेथील अधिकारी व कर्मचा-यांना आरोग्य विभागाच्या मदतीस द्यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take strict measures for corona prevention nirmala pansare