टाकळी हाजी - बिबट्यामुळे मानव वस्तीत कोल्हे कुई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याने चांगलाच उच्छाद मांडला आहे. पाळीव प्राण्यांवर होणारे दररोजचे हल्ल्याच्या घटना घडतच आहेत. त्यात उसाचा आडोसा घेऊन राहणारे कोल्हे देखील भितीच्या वातावरणात असून, मानव वस्तीत त्यांची कोल्हे कुई पहावयास मिळू लागली आहे. 

टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याने चांगलाच उच्छाद मांडला आहे. पाळीव प्राण्यांवर होणारे दररोजचे हल्ल्याच्या घटना घडतच आहेत. त्यात उसाचा आडोसा घेऊन राहणारे कोल्हे देखील भितीच्या वातावरणात असून, मानव वस्तीत त्यांची कोल्हे कुई पहावयास मिळू लागली आहे. 

घोड व कुकडी नदीच्या पाणी व्यवस्थापनेमुळे मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे. शिरूर तालुक्यात वाढलेली साखर कारखान्यांची संख्या यामुळे देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करू लागला आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी उसाची लागवड वाढत आहे. 13 ते 14 महिणे असणारे उसाचे पिक जंगली प्राण्यांना चांगलाच आडोसा ठरत आहे. या आडोश्यामुळे जंगली प्राण्यांची प्रजनन क्षमता देखील वाढीस लागली आहे. त्यात बिबट्या सारख्या प्राण्यांची प्रजनन क्षमता वाढल्याचे दिसून येत आहे. या परीसरात अनेकवेळा बिबट्याची पिल्ले आढळून आली. वनविभागाने मात्र पुन्हा बिबट्याच्या मादीला ही पिल्ले सोपवल्याचे दिसून आले. त्यामुळे या परीसरात बिबट्यांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बिबट्याचे वाढलेले प्रमाण पहाता इतर अनेक प्राण्यांच्या वाढीसाठी वनविभागाने योजना आखल्या पाहिजे होत्या. त्यातून जीवो जीवस्य जीवनम पद्धतीने नैसर्गीक साखळी तयार झाली असती. परंतू फक्त बिबट्याच्या संख्येत वाढी मुळे इतर जंगली प्राण्यांवर मात्र त्याचा परीणाम झाल्याचे दिसून येत आहे. बिबट्या भक्षासाठी पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. काही जंगली प्राण्यांची संख्या कमी झाल्याने ते देखील मानववस्तीच्या आश्रय करून राहू लागल्याचे दिसून येऊ लागले आहेत. उसाच्या कडेला नेहमी कोल्ह्यांची कोल्हे कुई ऐकू येत होती. मात्र अशा कोल्ह्या कुईचा आवाज देखील बंद झाला असून वस्तीच्या ठिकाणी बिबट्याच्या भितीने सैरवेर भटकंती करताना दिसू लागले आहेत. गटाच्या संख्येने या कोल्ह्याचे दर्शन होऊ लागले आहेत. चांडोह, फाकटे, जांबूत, पिंपरखेड या परीसरात कोल्हे संख्येने राहताना दिवसा ढवळ्या दिसू लागली आहेत. 

वनविभागाने उपाय योजना करण्याची आवश्यकता...
बिबट्याच्या वाढती संख्या पहाता इतर प्राण्यांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. बिबट्या ससे सारखे प्राणी भक्ष म्हणून खाऊन त्याची उपजीवीका करू शकतो. यासाठी वनविभागाने अशा प्राण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यातून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले कमी होऊ शकतात.     

Web Title: Takli Haji - The fox are in residential area