पन्नास हजाराची लाच घेताना तलाठ्याला पकडले

Talathi was captured while taking a bribe of fifty thousand
Talathi was captured while taking a bribe of fifty thousand

पुणे : खरेदी केलेल्या 20 गुंठे जमिनीची सातबाऱ्याच्या उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सजा सुसगांवच्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सचिन तुकाराम जाधव (वय 29रा. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी सुसगाव येथे 20 गुंठे जमीन खरेदी केली आहे. त्याची नोंद सातबाऱ्याच्या उताऱ्यावर करावी यासाठी त्यांनी अर्ज केला होता. जाधव याने या कामासाठी 70 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 50 हजार रुपये घेण्यास जाधव तयार झाला. त्यामुळे याबाबत लाच लुचपतकडे तक्रार करण्यात आली. त्याची पडताळणी केली असता, त्यात तथ्य आढळून आले. त्यानुसार सापळा रचून जाधवला रंगेहात पकण्यात आले.

याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक राजेश बसनोडे, अतिरिक्त अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com