
तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण महामार्गावर फलकेवाडी ते माळवाडी दरम्यानच्या दोन किलोमीटर टप्प्यात रस्त्याच्या मधोमध आणि बाजूच्या पट्ट्यांवरही मोठे खड्डे पडले आहेत. या व्यस्त महामार्गाच्या दुरुस्तीकडे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) सतत दुर्लक्ष होत आहे.