ढमढेरे शाळेच्या इमारतीचा प्रस्ताव तातडीने पाठवा

नागनाथ शिंगाडे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जिल्हा परिषदेच्या सभापती सुजाता पवार यांची सूचना; शाळेच्या दुरवस्थेची पाहणी

तळेगाव ढमढेरे (पुणे): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक एक व दोनची दुरुस्ती करून उपयोग होणार नाही, तर संपूर्ण इमारतच नवीन बांधणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी व्यक्त केले. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे त्वरित पाठविण्याची
सूचना बांधकाम विभागाचे अधिकारी व केंद्र प्रमुखांना दिली.

शाळेच्या दुरवस्थेबाबत काही ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत त्यांनी गुरुवारी (ता. 23) शाळेची पाहणी केली. पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, माजी सभापती आरती भुजबळ, पंचायत समितीच्या सदस्या अर्चना भोसुरे, बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, संचालक ऍड. सुदीप गुंदेचा, घोडगंगाचे संचालक पोपट भुजबळ, उपसरपंच उज्ज्वला भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य गणेश तोडकर, विजय ढमढेरे, सुनील ढमढेरे, सुधीर भुजबळ, उमेश भुजबळ आदी उपस्थित होते.

या शाळेचा दर्जा व गुणवत्ता चांगली असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेत दर वर्षी विद्यार्थी चमकतात. त्यामुळे या शाळेची पटसंख्या वाढली आहे. मुलींच्या शाळेत 311 मुली असून, मुख्याध्यापक पद अद्याप रिक्त आहे. मुलांच्या शाळेत 272 मुले आहेत. दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी बाके नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. शाळेच्या खोल्या गळत असून, इमारत नादुरुस्त झाली आहे. खोल्यांची दुरवस्था झाली आहे. शाळेची इमारत जुनी झाल्याने धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असल्याचे केंद्र प्रमुख राजेंद्र टिळेकर यांनी सांगितले.

शाळेची गुणवत्ता चांगली असली, तरी भौतिक सुविधांअभावी विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. वळसे पाटील यांनी शुक्रवारी (ता.24) शाळेची पाहणी करणार असल्याचे त्यांना सांगितले. दरम्यान, पवार यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. प्रास्ताविक अशोक राऊत यांनी केले.

Web Title: talegaon dhamdhere school building and sujata pawar