Pune Crime
तळेगाव स्टेशन: विनापरवाना बाळगलेल्या पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना चांगलीच भोवली.विनापरवाना पिस्तूलाने स्टंटबाजी करत असताना सुटलेली गोळी लागून एक परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.१३) रात्री साडेसातच्या सुमारास तळेगाव एमआयडीसीतील मिंडेवाडी (ता.मावळ) शिवारात घडली.याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन परप्रांतीय इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.पैकी एकाची पोलीस कोठडीत रवानगी झाली असून गोळी लागून एक गंभीर जखमी झालेला त्याचा मित्र रुग्णालयात उपचार घेत आहे.