esakal | Sahakarnagar तळजाई टेकडीवरील तळजाई माता मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

तळजाई टेकडीवरील ऐतिहासिक असणारे  तळजाई माता मंदिर

सहकारनगर : तळजाई टेकडीवरील तळजाई माता मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : तळजाई टेकडीवर  ऐतिहासिक असणारे तळजाई माता मंदिर सकाळी सहा वाजल्यापासून दर्शनासाठी  खुले करण्यात आले. अठरा महिन्यानंतर मंदिर खुले झाल्याने स्थानिक नागरिक व शहरातील विविध भागातून भक्त दर्शनासाठी दाखल झाले. गाभाऱ्यात प्रवेश करते वेळी मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: पुणे : उरुळी देवाची मध्ये काळभैरवनाथ मंदिर खुले

तत्पूर्वी बुधवारी मंदिरात साफसफाई तसेच सर्वत्र सॅनिटायझेशन करण्यात आले असून सकाळी 6 पासून सायंकाळी 9 या वेळेत मंदिर दर्शनासाठी भक्तांना खुले राहणार आहे.तसेच कोरोना काळात सरकारने सर्व नियम पाळून आणि दक्षता घेऊन मंदिर दर्शनासाठी खुले केले असल्याचे तळजाई माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख अण्णा थोरात यांनी सांगितले.नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे खुली झाल्याने भाविकांनी शासनाचे आभार मानले.

loading image
go to top