esakal | pune उरुळी देवाची मध्ये काळभैरवनाथ मंदिर खुले
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळी देवाची मध्ये काळभैरवनाथ मंदिर

पुणे : उरुळी देवाचीमध्ये काळभैरवनाथ मंदिर खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य शासनाने मंदिर उघडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत उरळी देवाची मध्ये ग्रामस्थांचे ग्रामदैवत असणारे काळभैरवनाथ मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिराचे निर्जंतुकीकरण करून सकाळी पहाटेची आरती करून परंपरेनुसार मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

हेही वाचा: बारा ते अठरा वर्षांच्या मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी

सालाबाद प्रमाणे पहिल्या माळेचा पोशाखाचा मान मा.पं.स्.सदस्य राजीव रामदास भाडळे यांना देण्यात आला असे पुजारी रवी राजगुरू यांनी सांगितले.मंदिर जरी उघडले असले तरी मंदिरात विना मुखपट्टी प्रवेश दिला जाणार नसल्याचे आणि करोना प्रतिबंध उपाययोजनांचे पालन करणार असल्याचे ट्रस्टी दत्तारे भाडळे यांनी सांगितले. जवळपास दिड वर्षांनी मंदिरात प्रवेश करता येणार असल्याने भाविकांनी सकाळपासूनच दर्शनाला सुरवात केली. आरतीच्या आणि नागाऱ्याच्या आवाजाने वातावरण भक्तिमय झाले. याप्रसंगी दत्तारे भाडळे, तात्या भाडळे, रवी राजगुरू, आप्पा भाडळे, नाथ सातव, अतिश भाडळे, आबनावे, आणि मोरे उपस्थित होते

हेही वाचा: पिंपरी : महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार

आरतीच्या आणि नागाऱ्याच्या आवाजाने वातावरण भक्तिमय झाले. याप्रसंगी दत्तारे भाडळे, तात्या भाडळे, रवी राजगुरू, आप्पा भाडळे, नाथ सातव , अतिश भाडळे, आबनावे, आणि मोरे उपस्थित होते

loading image
go to top