

Summar
ताम्हिणी घाटात थार कार ५०० फूट दरीत कोसळून सहा तरुणांचा भीषण अपघात झाला.
यातील चार मृतदेह सापडले असून उरलेल्या दोघांचा शोध अजूनही सुरू आहे.
मृत तरुण पुण्यातील वारजेमाळवाडी आणि उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.
पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात एक भीषण अपघात झाला. हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण आपली नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले होते. मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची थार कार घाटातील एका 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली होती. यामधील 4 जणांचे मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरुच आहे. आज या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर या तरुणांच्या कुटुंबियांसह मित्रांनाही शोक अनावर झाला.